सातारा : शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शुक्रवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी ही झालीच पाहिजे, शेतकर्यांना शेतीपंपासाठी दिवसा 12 तास विद्युत पुरवठा मिळावा, जिल्ह्यातील शेतकर्यांना पूर्ण ऊसाची एफआरपी मिळावी, सोयाबीनला प्रत्येक क्विंटल सहा हजार रुपये आणि कांद्याला प्रतिक्विंटल चार हजार रुपये बाजारभाव मिळावा, या मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेच्यावतीने राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर करण्यात आले.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे, जिल्हा उपाध्यक्ष देवानंद जाधव, वाई तालुकाध्यक्ष अनिल बाबर, सचिन शिंदे, सुर्यकांत फाळके, आशिष सपकाळ, राहुल पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.