महिलांच्या शरीरात विटामिन बी १२ योग्य प्रमाणात असणे गरजेचे

by Team Satara Today | published on : 28 July 2025


दीर्घकाळ निरोगी आणि कायमच सुधृढ राहण्यासाठी शरीरात योग्य प्रमाणावर विटामिन असणे आवश्यक आहे. शरीरासाठी सर्वच विटामिन्स अतिशय महत्वाचे आहेत. पण बऱ्याचदा महिलांच्या शरीरात विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण होते. महिला कायमच स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात. वाढत्या वयात किंवा वयाच्या तिशीनंतर शरीरात अनेक हार्मोनल बदल होण्यास सुरुवात होते. शरीरात निर्माण होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे बऱ्याचदा शारीरिक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. शरीरात विटामिन बी १२ योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. कारण मेंदूच्या कार्यासाठी, रक्तातील लाल पेशी तयार करण्यासाठी आणि मज्जासंस्था कायमच निरोगी राहण्यासाठी शरीरात मुबलक प्रमाणात विटामिन बी १२ असणे आवश्यक आहे. शरीरात विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. आज आम्ही तुम्हाला महिलांच्या शरीरात विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

महिलांच्या शरीरात विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर दिसणारी लक्षणे:

महिला कायमच स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. विटामिन बी १२ कमी झाल्यानंतर वारंवार चक्कर आल्यासारखे वाटू लागते. याशिवाय कितीही खाल्ल्यानंतर सुद्धा थकवा जाणवतो. चालताना किंवा बोलताना वारंवार थकल्यासारखे वाटू लागते. तसेच अचानक डोकं जड होणे. श्वास घेताना त्रास जाणवू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.

बऱ्याचदा विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे हात पाय सुन्न होणे, हातापायांमध्ये मुंग्या येणे किंवा एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अनेक अडथळे निर्माण होतात. वारंवार शरीरात मानसिक तणाव आणि थकवा जाणवू लागतो. तर काही सुई टोचल्या सारखे जाणवून विसरभोळेपणा वाढू लागतो.

विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे वारंवार तोंड येते. तसेच तोंडाच्या अल्सरची समस्या वाढून खाताना किंवा पाणी पिताना त्रास होतो. पोट स्वच्छ न झाल्यामुळे तोंडात अल्सर वाढतात. विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे तोंडात येणारे अल्सर बरे होतात. मात्र काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा नव्याने तोंडात अल्सर येऊ लागतात.

महिलांमध्ये विटामिन बी १२ ची कमतरता मोठ्या प्रमाणावर उद्भवते. गर्भधारणा, स्तनपान, मासिक पाळीच्या दिवसांमध्ये होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे विटामिन बी १२ च्या पातळीवर गंभीर परिणाम दिसून येतात. त्यामुळे आहारात विटामिन बी १२ युक्त पदार्थांचे अधिक सेवन करावे. याशिवाय अनेक महिलांमध्ये पचनाच्या समस्या वारंवार उद्भवू लागतात.

FAQs (संबंधित प्रश्न)

विटामिन बी12 म्हणजे काय?

विटामिन बी12 हे एक महत्वाचे पाण्यात विरघळणारे विटामिन आहे, जे शरीरासाठी आवश्यक आहे. हे विशेषतः मेंदू आणि मज्जासंस्थेच्या कार्यासाठी, तसेच लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी महत्वाचे आहे.

विटामिन बी12 ची कमतरता कशी तपासावी?

रक्त तपासणीद्वारे विटामिन बी12 पातळी तपासली जाते.

विटामिन बी12 च्या अतिसेवनाने काय होते?

शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त विटामिन बी12 मूत्रावाटे बाहेर टाकले जाते, त्यामुळे अतिसेवनाने फारसे दुष्परिणाम होत नाहीत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ज्येष्ठ चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांची अर्कशाळा संस्थेस सदिच्छा भेट
पुढील बातमी
सहकारातून जावली तालुक्याचा कायापालट होईल

संबंधित बातम्या