सैदापूर येथे सुमारे सव्वाचार लाखांची घरफोडी

by Team Satara Today | published on : 20 June 2025


सातारा : सैदापूर, ता. सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी सुमारे सव्वाचार लाखांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 रोजी दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत विद्या मानसिंग केसरकर राहणार सैदापूर सातारा यांच्या राहत्या घराच्या दरवाजाची कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील दहा तोळे वजनाचे, सुमारे सव्वा चार लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गुरव करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जातीवाचक शिवीगाळ आणि खंडणी प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल
पुढील बातमी
अपघात प्रकरणी क्रेन चालकावर गुन्हा

संबंधित बातम्या