सातारा : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी निर्णय टप्प्याकडे निघाली आहे .राज्यातील 247 नगरपालिका वैयक्तिक 147 नगरपंचायतीसाठी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत सोमवारी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आली .यामध्ये सातारा जिल्ह्याचा विचार करता येथील पाच नगरपालिका व एक नगरपंचायत यांना खुल्या प्रवर्गाची लॉटरी लागली आहे यामुळे येथील राजकीय समीकरणांना आता इथून पुढे वेग येणार आहे .
रहिमतपूर म्हसवड या खुल्या प्रवर्ग महिला तर पाचगणी व मलकापूर या अनुसूचित जातीसाठी नगराध्यक्ष पदासाठी आरक्षित झाले आहेत .सातारा, फलटण, वाई,कराड, महाबळेश्वर तसेच मेढा नगरपंचायत या खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाले आहेत .नगराध्यक्ष पदासाठी खुल्या प्रवर्गाची आरक्षणे पडल्यामुळे साताऱ्याची सत्तास्थाने असणाऱ्या तसेच भाजपचे वर्चस्व असणाऱ्या चार आमदारांच्या कार्यक्षेत्रात खुला प्रवर्ग आरक्षण पडल्याने राजकीय समीकरणांची जुळवाजुळव जोरदार पद्धतीने होणार आहे .
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला जानेवारी अखेर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्याने नगर विकास विभागाने त्या दृष्टीने तयारी अंतिम टप्प्यात आणली होती . या पार्श्वभूमीवर सोमवारी तत्काळ नियोजनबद्ध रीतीने ही आरक्षणे जाहीर करण्यात आली राजकीय पक्षांमध्ये हालचालींना आता वेग आला असून उमेदवार निवडीची समीकरणे मांडली जाणार आहेत . .सातारा जिल्ह्यात भाजपचे चार आमदार शिंदे गटाचे दोन तर राष्ट्रवादीचे दोन असे राजकीय बलाबल आहे त्या दृष्टिकोनातून आता स्थानिक समीकरणांची मांडणी होताना महायुती की मैत्रीपूर्ण लढती या दृष्टीने आता महायुतीच्या घटक पक्षांची चर्चा यापुढे वेग घेणार आहे .
साडेतीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नऊ नगरपरिषद आणि एक नगरपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे .प्रभाग निश्चितीनंतर त्यांची आरक्षणे ही येत्या बुधवारी दिनांक आठ रोजी सोडत पद्धतीने जाहीर केली जाणार आहेत ओबीसी आरक्षण आणि प्रभाग आराखड्यांच्या संबंधित याचिका निकाली निघाल्यानंतर राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतीच्या सोडतीची तयारी संपूर्ण तयारीशी पार पडली . प्रभाग आरक्षणे निश्चित झाल्यानंतर खऱ्या अर्थाने राजकीय समीकरणांना वेग येणार आहे यासंदर्भातील ज्या हरकती नोंदवायच्या आहेत त्या 14 ऑक्टोबर पर्यंत नोंदवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
सातारा : खुला प्रवर्ग
फलटण : खुला प्रवर्ग
वाई : खुला प्रवर्ग
कऱ्हाड : खुला प्रवर्ग
महाबळेश्वर : खुला प्रवर्ग
रहिमतपूर : खुला प्रवर्ग (महिला)
म्हसवड : खुला प्रवर्ग (महिला)
पाचगणी : अनुसूचित जाती
मलकापूर : अनुसूचित जाती
मेढा (नगरपंचायत) : खुला प्रवर्ग .