सातारा : सातार्यातील उपनगरात राहणार्या एका वृध्दाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याच्याकडून पैसे, सोने घेवून ब्लॅकमेल करत हनी ट्रॅपमध्ये अडकवणार्या टोळीचा शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणात महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, सातारा पोलिसांनी शुक्रवारी रात्री ही कारवाई केली. सातारा उपनगरात वृध्दाची सुमारे 2 वर्षापूर्वी एका महिलेसोबत त्यांची ओळख झाली. यातून महिलेने वृध्दाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. वेळोवेळी भेटीगाठी झाल्यानंतर महिलेने वृध्दाकडून पैसे घेण्यास सुरुवात केली. यातूनच महिलने आणखी साथीदारांना यामध्ये सामील करुन दोघांचे अश्लील फोटो, व्हिडीओ काढले. यामुळे वृध्द घाबरला. या टोळीने मागेल तसे पैसे, सोने देण्यास भाग पाडून ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केली. त्यातून वृध्दाने तक्रार दिल्याने पोलिसांनी कारवाई केली. रात्री उशीरापर्यंत कारवाई सुरु होती.