उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्रम महर्षी, तर यशवंतभाऊ भोसले यांना श्रमयोगी पुरस्कार प्रदान

सातारा चेंबर्स ऑफ कॉमर्स, पुणे श्रमिक, कामगार आणि उद्योजकांकडून करण्यात आले आयोजन

by Team Satara Today | published on : 10 May 2025


पुणे : सातारा चेंबर्स ऑफ कॉमर्स, पुण्यातील श्रमिक, कामगार आणि उद्योजक यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्रम महर्षी आणि कामगार क्षेत्रातील 30 वर्षांचे प्रदीर्घ सेवेबद्धल यशवंतभाऊ भोसले यांना श्रमयोगी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. युद्धसदृश परस्थितीमुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे तातडीची बैठक लावल्याने एकनाथराव शिंदे यांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून पर्यटन मंत्री ना.शंभुराज देसाई यांना या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पाठवले. ना. शंभूराज देसाई यांनी उप मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा श्रम महर्षी हा पुरस्कार स्वीकारला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बबनराव शिंदे पाटील होते. यावेळी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे सभासद प्रचंड संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यावतीने स्वतः नामदार शंभूराज देसाई यांनी श्रम योगी हा पुरस्कार सन्मान चिन्ह देऊन यशवंतभाऊ भोसले यांचा गौरव केला. यावेळी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आयुष्यातील अनेक चांगल्या कामांचा गौरव त्यांनी केला. 

संयोजक जेष्ठ पत्रकार अरुण कांबळे यांनी संस्थेचा उद्देश सांगितला. संचालक विजय सोनावले यांनी प्रास्ताविक केले. गणेश दरेकर, राजेंद्र खेडेकर, स्वानंद राजपाठक, रामराजे भोसले, जयदेव अक्कलकोटे, दिनेश पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

याच कार्यक्रमात संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादित या संत तुकाराम नगर मधील गृह सोसायटीच्या सभासदांना नामदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते शेअर सर्टिफिकेट वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. 

सोसायटीचे सर्व कार्यकारणी पदाधिकारी, अंकुश वाघमारे, ओंकार जोकारे, मानसीताई देशपांडे, सतीश सासवडे, शिरीष सासवडे, योगेंद्र आरवडे, राजाराम भोंडवे, मनोज नांदे, विनायक निकम, इस्मतदीदी सुलताना सय्यद, शालनताई महापुरे, फौजदार गायकवाड,  अप्पूकूटन नायर, अंकुश गायकवाड, सुधाकर शिंदे, मल्लेश कोरवी, किसन भाग्यवंत, राजेंद्र पाटील, रावपाबळे, अप्पा माने, संतोष चौधरी, मती आरतीताई पराळे, अरुणा ताई भंडारी, शालन ताई भंडारे, शेहनाज मौलवी, गणेश गुलदगड, गवळण ताई, उषाताई टाकळकर, कार्यालयीन सचिव अमोल घोरपडे, सोमनाथ वीरकर, अर्ष जमादार, सोनाली वीरकर आदींसह मोठया संख्येने पत्रकार बंधू-भगिनी यावेळी उपस्थित होत्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
पुढील बातमी
हळदीच्या ओल्या अंगाने 'तो' सीमेवर रवाना…

संबंधित बातम्या