सह्याद्री कारखान्याच्या बॉयलरचा भीषण स्फोट

4 कर्मचारी गंभीर जखमी

by Team Satara Today | published on : 20 March 2025


कराड : यशवंतनगर, ता. कराड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात चाचणी घेत असताना ईएसपी बॉयलरचा स्फोट झाला. आज, गुरूवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत तीन ते चार कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

शैलेश भारती (वय ३२, रा. उत्तर प्रदेश), अमित कुमार (वय १९, रा. बिहार), धर्मपाल (वय १९, रा. उत्तर प्रदेश ) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. 

यशवंतनगर येथे सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात ऊसाचे गाळप सुरू आहे. गत पंधरा दिवसापूर्वी ईएसपी बॉयलर कारखान्यात बसविण्यात आला आहे. त्याची आठ दिवसापासून चाचणी सुरू आहे. गुरूवारी सकाळच्या सुमारास चाचणी सुरू असताना तेथे मोठा स्फोट झाला. त्या दुर्घटनेत चाचणीचे काम करणारे तीन ते चार कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी खासगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. कारखानास्थळावर पोलिसांसह आपत्कालीन यंत्रणा दाखल झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नागपुरातील नंदनवन-कपिलनगरमध्ये कर्फ्यू हटला
पुढील बातमी
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू

संबंधित बातम्या