सातारा : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साता-यात दि.१ जानेवारी ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान होणार आहे. यानिमित्त सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग यांच्यावतीने विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धांचे निकाल जाहीर करण्यात आले असून जिल्हयातील विविध तालुक्यातील गुणवंतांनी यात यश मिळवले आहे.
साहित्य संमेलनात युवा पिढीचा सहभाग वाढावा यासाठी निबंध, वक्तृत्व, कथाकथन, स्वरचित कविता, चित्रकला अशा विविध स्पर्धा महाविद्यालयीन गट, शिक्षक, शिक्षकेत्तर गट, ९ ते १२ वी गट, ६ वी ते ८ वी गट अशा विविध गटात आयोजित करण्यात आल्या होत्या. त्याला जिल्हयातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचे परीक्षण त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांनी केले असून विविध स्पर्धांचा निकाल परीक्षकांनी जाहीर केला.
निबंध स्पर्धा - महाविद्यालयीन गट - अर्जुन प्रीती दत्तात्रय (खंडाळा) शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी गट - प्रथम - दीपाली प्रवीण जाधव (जि.प.प्रा.शाळा गारवडी, खटाव), व्दितीय - सौ. वनिता वर्धमान गायकवाड (जि.प.शाळा काळज, फलटण ), सौ.सुषमा प्रशांत मोरे (जि.प.प्रा.शाळा, ठक्करनगर,नागेवाडी, सातारा). ९ ते १२ गट - प्रथम- स्वप्नाली भाऊ बिराणे, गिरीस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, महाबळेश्वर, व्दितीय - ईश्वरी प्रकाश थोरवे (विद्यासागर माध्यमिक विद्यालय व्याहळी पु., वाई), अक्षता विठ्ठल चव्हाण (चंद्रकांत बा. जाधव विद्यालय, शेरेवाडी, सातारा). ६ वी ते ८ वी गट - प्रथम- अनुष्का अंलकार मडके (जि.प.प्राथ.शाळा लिंब नं.१, सातारा), व्दितीय- निधी नितीश रांजणे (जि.प. प्राथ. शाळा, महू, जावली), तृतीय - शार्विल नितीन राजमाने (श्री सेवागिरी विद्यालय, पुसेगाव, खटाव).
वक्तृत्व स्पर्धा - शिक्षक व शिक्षकेत्तर गट - प्रथम - ज.तु.गार्डे (जि.प. प्राथ.शाळा, हिंगणगाव, फलटण ), व्दितीय - श्रीमती तृप्ती अमोल मोहिते (पीएमश्री न.पा. शाळा क्रं.५, वाई), तृतीय - सचिन रामचंद्र गोसावी (जि.प.प्राथ. शाळा, मुसंडवाडी, खटाव. ), ९ ते १२ वी गट - प्रथम - वेदिका दुर्गादास माळी, (द्रविड हायस्कूल, वाई), व्दितीय- वैष्णवी भीमराव येवले (न्यू इंग्लिश स्कूल, सातारा), तृतीय - आदित्य राजेंद्र भिलारे (न्यू इंग्लिश स्कूल, बामणोली, जावळी). ६ वी ते ८ वी गट - प्रथम - वेदिका विजय भोसले, (आत्माराम विद्यामंदिर ओगलेवाडी, कराड), व्दितीय - कावेरी किरण घाडगे (शिवाजी हायस्कूल, वडूज, खटाव), तृतीय - पूजा रघुनाथ देसाई (जि.प. प्राथ. शाळा त्रिपुडी, पाटण).
स्वरचित कविता - शिक्षक, शिक्षकेत्तर गट - प्रथम - पोपट दौलती कासुर्डे (जि.प.प्राथ.शाळा, शिरवळ मुले, खंडाळा), व्दितीय - सौ. तृप्ती अमोल मोहिते (न.पा.शाळा क्रं.५, वाई ), तृतीय विभागून - सौ. रंजना श्रीमंत सानप (जि.प.शाळा सुर्याचीवाडी, खटाव), सौ.राणी गणपत जगताप (आत्माराम विद्यालय, ओगलेवाडी, कराड), ९ ते १२ वी गट - प्रथम - वैष्णवी भीमराव येवले (न्यू इंग्लिश स्कूल, सातारा), व्दितीय - नयन विजय करकटे (राजेंद्र विद्यालय, खंडाळा), तृतीय - सलोनी सुनील सरतापे (किसनवीर विद्यालय, वाई). ६ वी ते ८ वी गट - प्रथम - पौर्णिमा निवास भानसे (विद्यासागर माध्यमिक विद्यालय, वाई), व्दितीय - अनुप्रिया सचिन चव्हाण (लाहोटी कन्या विद्यालय, कराड), तृतीय - तनुजा संतोष लागणे (पाटण ).
कथाकथन स्पर्धा - शिक्षक, शिक्षकेत्तर गट - प्रथम- अमितकुमार पांडुरंग शेलार (ज्ञानभारती प्राथ. शाळा कृष्णानगर, सातारा), व्दितीय- सौ. रंजना श्रीमंत सानप (जि.प.शाळा मोहितेमळा), तृतीय - वसंत पांडुरंग जाधव - जि.प.शाळा जाधववाडी (फ), फलटण. ९ ते १२ वी गट - प्रथम - प्रियांका गोपीनाथ मारकड (सुशीलादेवी साळुंखे ज्युनियर कॉलेज, सातारा), व्दितीय - हितेशनी शिवदास महांगडे (रामेश्वर विद्यालय, विंग), तृतीय - स्वराली सोमनाथ पिसाळ (विद्यासागर माध्यमिक विद्यालय, व्याहळी पुर्नवसन, वाई). ६ वी ते ८ वी - प्रथम - ईरा श्रीराज दीक्षीत-न्यू इंग्लिश स्कूल, सातारा, व्दितीय- पूर्वा विठ्ठल चिकणे (जि.प.शाळा, भणंग), तृतीय - तनुजा संतोष लागवे (जि.प.शाळा त्रिपुडी, पाटण ).
चित्रकला स्पर्धा - शिक्षक, शिक्षकेत्तर गट - प्रथम - पियुष अनिल गायकवाड (जि.प. प्राथ. आदर्श केंद्र शाळा, मेढा ता.जावली), व्दितीय- श्रीकांत वसंतराव जाधव (बॉलस्म स्कूल, सातारा), तृतीय - बी.जी. धर्माधिकारी (छत्रपती शिवाजी हायस्कूल, वडूज, खटाव). महाविद्यालयीन गट - प्रथम - यश संतोष डुंबरे (कला महाविद्यालय,सातारा), व्दितीय - वैभवी हर्षल मुळे (धनंजयराव गाडगीळ महाविद्यालय, सातारा), तृतीय- साक्षी शिवाजी माळी (सौ. सुशीला गाढवे महाविद्यालय, खंडाळा). ९ ते १२ वी गट - प्रथम - सानिका प्रकाश फडतरे (धनंजयराव गाडगीळ कॉलेज, सातारा), व्दितीय- आयुष विशाल रोकडे (न्यू इंग्लिश स्कूल, कुडाळ, हुमगाव), तृतीय- सोहम बाळकृष्ण कुंभार (आत्माराम विद्यामंदिर ओगलेवाडी, कराड). ६ वी ते ८ वी गट - प्रथम - समर्थ नवनाथ पवार (न्यू इंग्लिश स्कूल,सातारा), व्दितीय- दीक्षा अभय संदे (म. गांधी विद्यालय, वडगाव हवेली, कराड), तृतीय - निधी नितीश रांजणे (जि.प.प्राथ. शाळा, महू, जावली).