12:07pm | Nov 11, 2024 |
सातारा : आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून सातारा-जावली मतदारसंघात विकासपर्व सुरु आहे. सर्वत्र कोट्यवधींची विकासकामे मार्गी लावली आहेत. पाच वर्ष कधीही नजरेस न पडणारे विरोधक निवडणूक आली की मतांचा जोगवा मागत फिरत आहेत. निवडणुकीपुरतं उगवणाऱ्यांनी एक तरी काम केलं आहे का? त्यांना मते मागण्याचा नैतिक अधिकार आहे का? हा प्रश्न मतदारांनी विरोधकांना करावा आणि जनतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या, विकासकामे मार्गी लावणाऱ्या आ. शिवेंद्रराजेंना विक्रमी मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सातारा शहरात विविध भागामध्ये पदयात्रांचा धडाका सुरु आहे. सोमवारी सकाळी सेनॉर चौक, आंदेकर चौक, बाबर कॉलनी, डॅनी पवार, झेंडा चौक, बाळासो भुजबळ घर, भैरवनाथ मंदिर, पटांगण ते जगन्नाथ किर्दत घर अशी भव्य पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, आरपीआयसह महायुतीतील सर्व घटकपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, दोन्ही आघाड्यांचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. ठिकठिकाणी पदयात्रेचे फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले. पदयात्रेत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाल्याने पदयात्रा मार्गाला यात्रेचे स्वरूप आले होते. वेदांतिकाराजेंनी पदयात्रा मार्गावरील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्याशी संवाद साधला.
सातारा शहरासह संपूर्ण मतदारसंघाचा कायापालट करून शिवेंद्रराजेंनी मतदारसंघाला 'आयडियल' मतदारसंघ बनवले आहे. प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून जाणारा, प्रत्येकाचे प्रश्न, समस्या सोडवणारा आपला हक्काचा माणूस म्हणजे शिवेंद्रराजेच आहेत. विरोधकांचे या उलट आहे. त्यांना जनतेचे काहीही घेणेदेणे नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी विरोधाला विरोध म्हणून निवडणूक लढवणाऱ्या अशा स्वार्थी लोकांना मतदारसंघातील जनतेने चांगलेच ओळखले आहे. त्यांच्या भूलथापांना जनता भुलणार नाही. जनतेच्या हक्काच्या शिवेंद्रराजेंचा विजय निश्चित आहे. पण, विक्रमी मताधिक्य देऊन एक वेगळा इतिहास घडवण्यासाठी सर्वांनी मतदान करावे आणि या ऐतिहासिक विजयात आपले योगदान द्यावे, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी केले.
मंगळवार दि. १२ रोजी सकाळी ७ वाजता समर्थ मंदिर, बोगदा, पापाभाई पत्रेवाले, रविंद्र ढोणे घर, खारी विहीर, महेश महाडिक घर, राजू भोसले घर, डफळे हौद, विश्वेश्वर चौक, गुजर आळी, कात्रेवाडा, हेडगेवार चौक, रमेश जाधव दुकान, चांदणी चौक ते राजवाडा अशी पदयात्रा, सायंकाळी ६. ३० वाजता महादेव मंदिर जवळ दौलतनगर आणि रात्री ८ वाजता विजय मंडळ शिर्के शाळा येथे कोपरा सभा होणार आहे. पदयात्रा आणि कोपरा सभेला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये चुरशीने 69 टक्के मतदान |
याच साठी केला होता अट्टाहास! |
जिल्ह्यात मतदानासाठी येणार्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी |
पूर्णाहूतीने सज्जनगडावर विष्णू पंचायतन यागाची सांगता |
शिर्डीहून साईंच्या पालखीचे येत्या २९ नोव्हेंबरला प्रस्थान |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
'उमेद'ने केले पावणे दोन लाख कुटुंबांचे समुपदेशन |
आचार संहितेचा भंग केल्यास कडक कारवाई : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
महायुतीचे नेते विश्वासात घेत नसल्याची रयत क्रांती संघटनेची तक्रार |
कराड दक्षिणमधील जनता फालतू माणसाला संधी देत नाही : माजी आ. रामहरी रूपनवर |
मतदार जागृती प्रश्नमंजुषा स्पर्धा कोरेगाव येथे उत्साहात! |