सातारा : इयत्ता बारावीची परीक्षा जिल्ह्यामध्ये सुरळीतपणे सुरू झाली आहे. कॉपी-बहादरांवर ड्रोन ची करडी नजर राहणार असून त्याचे नियोजन सातारा जिल्हा पोलिसांनी केले आहे. बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामकृष्ण विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज नागठाणे येथे ड्रोन अवकाशामध्ये भिरभिरत आहे.
सदरची परीक्षा ही कॉपी मुक्त अभियान करण्याकरिता पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक डी. एस. वाळवेकर यांनी या उपायोजना केल्या आहेत. अधीक्षक कार्यालयाचे पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वास देशमुख यांच्या माध्यमातून ड्रोन ची चलन यंत्रणा सुरू आहे. इयत्ता बारावीच्या परीक्षेत ड्रोन द्वारे व्हिडिओ शूटिंग केले जात आहे.
बारावी व आगामी दहावीच्या परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. यापुढेही बहुतांश परीक्षा केंद्रांवर ड्रोन द्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. या माध्यमातून कॉपीबहादरांना आळा घातला जाणार आहे.