कृत्रिम हात पाय व कॅलिपर्स मोजमापासाठी ऑन द स्पॉट नि:शुल्क तपासणी व साहित्य वाटप शिबीराचे आयोजन

by Team Satara Today | published on : 19 July 2025


सातारा : केंद्र शासनाच्या एडिप योजनेतंर्गत अलिम्को या शासनमान्य संस्था संचलित एस. आर. ट्रस्ट या संस्थेमार्फत सातारा व जावली तालुक्यात दिव्यांगाना कृत्रिम हात पाय व कॅलिपर्स मोजमाप घेवून ऑन द स्पॉट नि शुल्क तपासणी व साहित्य वाटप शिबीराचे आयोजन सोमवार दि. 21 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वा. जिल्हा परिषद शाळा, कोडोली ता. जि. सातारा शेजारी ग्रामपंचायत सभागृह येथे आयोजित करणेत आलेले आहे.  

या शिबीरासाठी सोमवार दिनांक 21 जुलै रोजी सकाळी 10 वा जिल्हा परिषद शाळा, कोडोली ता. जि. सातारा शेजारी ग्रामपंचायत सभागृह येथे जास्तीत जास्त अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग लाभार्थीनी स्वखर्चाने उपस्थित राहून शिबीराचा लाभ घ्यावा. असे आवाहन, सातारा पंचायत समिती गटविकास अधिकारी (नि. श्र.) सतिश बुध्दे यांनी केले आहे.  शिबीरास येताना लाभार्थ्याने आधार कार्ड, रेशनकार्ड, वैदयकीय प्रमाणपत्र, युडी आयडी कार्ड यांच्या मूळ प्रती व झेरॉक्स प्रती आणाव्यात, असेही प्रसिध्दीपत्रकात कळविले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ऊर्जा क्षेत्रातील संशोधन व सहकार्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचा कॅलिफोर्निया विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार
पुढील बातमी
कराड येथे 22 जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

संबंधित बातम्या