सातारा : कराड येथील एका डॉक्टरची फसवणूक केल्याप्रकरणी सचिन विलास चव्हाण, (रा. कोरेगाव, ता. कोरेगाव) याच्याविरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. अनिल भगवान देसाई (वय ५९, रा. शनिवार पेठ, कराड) यांनी फिर्याद दिली. चव्हाण याने डॉक्टर देसाई हॉस्पिटलचे वेगवेगळ्या मेडिक्लेम इन्शुरन्सकडे कॅशलेस फॅसिलिटी सुरु हाण्यासाठी तसेच इतर डॉक्टर मित्रांचा विश्वास संपादन करून ३ लाख ८२ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. डिसेंबर २०२३ पासून ही फसवणूक झाली आहे.
कराडच्या डॉक्टरची फसवणूक केल्याप्रकरणी कोरेगावच्या युवकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 01 February 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा