इमारतीवरून पडलेल्याचा उपचारादरम्यान मृत्यू

by Team Satara Today | published on : 08 August 2025


सातारा : इमारतीवरून पडलेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 जुलै रोजी जयभीम सिद्ध लिंगप्पा होनमनी रा. गडकर आळी, मंगळवार पेठ, सातारा हे बांधकाम साईटवर काम करीत असताना चौथ्या मजल्यावरून पडून जखमी झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गुरव करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नोकरीच्या आमिषाने वीस लाखांची फसवणूक; दोन जणांवर गुन्हा
पुढील बातमी
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा

संबंधित बातम्या