सातारा : खिंडवाडी येथील रि स नं २२/१ ब मधील १ गुंठे जमिनीचे मोबदला कुलमुख्यत्यार सन २०२३ करून घेतलेली जागा आमच्या नावावर करा असे म्हणल्याच्या कारणावरून रवींद्र रामअवतार यादव (वय ४० रा. कारंडवाडी, सातारा) यांना चिडून जाऊन शिवीगाळ,दमदाटी करत हाताने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी नासिर इस्माईल मुजावर आणि त्यांची दोन्ही मुले (रा.अहिरे कॉलनी,सातारा) यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे करत आहेत.
जमिनीच्या वादावरून एकाला बेदम मारहाण; अहिरे कॉलनी तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा
by Team Satara Today | published on : 25 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा