सातारा : श्री गणेशोत्सव 2026 च्या अनुषंगाने सातारा शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, अपघात रोखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सातारा पोलीस प्रशासनाने अंतर्गत वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, हे आदेश दिनांक 14 सप्टेंबर च्या सकाळी 10 ते 25 सप्टेंबर च्या रात्री 10 वाजेपर्यंत लागू राहतील.
नागरिकांची सुरक्षितता आणि उत्सवातील शिस्त लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने हे प्रमुख नियम जारी केले आहेत.
वाहतुकीच्या रस्त्यावर ज्या बाजूला गणेश मंडळांचे मंडप उभारण्यात आले आहेत, त्याच बाजूला 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान वाहने पार्क करावी लागतील.
सातारा शहरात प्रवेश करणार्या सर्व अवजड वाहनांना केवळ सकाळी 06:00 ते सकाळी 10:00 या वेळेतच शहरात येण्याची परवानगी असेल. या वेळेव्यतिरिक्त शहरात आढळणार्या अवजड वाहनांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
राजपथ रोड, शाहू चौक ते समर्थ मंदिर रोड आणि मोती चौक ते पोवई नाका या रस्त्यांच्या कडेला असणारी बेवारस वाहने किंवा स्थानिक रहिवाशांची कायमस्वरूपी उभी असणारी वाहने 14 ते 25 सप्टेंबर या कालावधीत रस्त्यावरून हटवून पर्यायी पार्किंगच्या ठिकाणी लावावी लागतील.
उत्सवाच्या काळात सातारा शहरात खरेदीसाठी चारचाकी वाहनाने येणार्या नागरिकांसाठी तालीम संघ आणि राजवाडा येथील आळूचा खड्डा वाहनतळ येथे पार्किंगची सोय करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्व नागरिकांनी या नियमांची नोंद घेऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सातारा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातार्यातील वाहतुकीत बदल
14 ते 25 सप्टेंबर दरम्यान राहणार आदेश लागू; पोलीस अधीक्षकांनी काढले परिपत्रक
by Team Satara Today | published on : 12 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा