अंतराळातून कसा दिसतो महाकुंभ मेळा?

नासाच्या अंतराळवारीने शेअर केले अप्रतिम फोटो...

by Team Satara Today | published on : 28 January 2025


प्रयागराज : भारतीय संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक असलेला दर १२ वर्षांनी भरणारा कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा म्हणून ओळखला जातो. भारतातील हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक या चार शहरांमध्ये दर १२ वर्षांनी आयोजित होणार्‍या या मेळ्यामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होत असतात. यंदा उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे कुंभमेळा भरला आहे. या कुंभमेळ्यात पवित्र नद्यांच्या संगमामध्ये स्‍नान करून पाप धुवून पुण्य संपादन करण्याच्या भावनेने भारतासह जगभरातून लाखो भाविक दररोज प्रयागराजमध्ये येत आहेत. रोज येणाऱ्या भाविकांचा ओघ अखंड सुरू आहे. आज ४६.६४ लाखाहून अधिक लोकांनी पवित्र स्‍नान केले आहे. तर २६ जानेवारी पर्यंत १३.२१ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र नद्यांच्या संगमामध्ये श्रद्धेची डुबकी लावत स्‍नान केल्‍याची माहिती उत्तर प्रदेश सरकारने दिली आहे.

जगातील सर्वात मोठा मानवी मेळा पृथ्वीपासून ४५० किमी अंतरावर अंतराळातूनही दिसतो. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून या महाकुंभाचे फोटो टिपण्यात आले आहेत. अंतराळवीर डॉन पेटिट यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर गंगेच्या संगमाची प्रकाशमय छायाचित्र शेअर केली आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, '२०२५ महाकुंभमेळा गंगा नदी काठावरील तीर्थयात्रा रात्रीच्या वेळी आयएसएसवरून, जगातील सर्वात मोठा मानवी मेळा चांगल्या प्रकारे रोषणाईने सजवला गेला आहे.'


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फेब्रुवारीनंतर राज्यात १० हजार जागांसाठी मेगा पोलीस भरती
पुढील बातमी
काल्यातील नागरीवस्तीत बिबट्याचा वावर

संबंधित बातम्या