सातारा : अपघातात वृद्धाला जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रानमळा ते डॉ. जे. डब्ल्यू. आयरन स्कूल रस्त्यावर अज्ञात दुचाकीस्वाराने दिलावर अहमद मुल्ला (वय 83, रा. डॉ. जे. डब्ल्यू. आयरन शाळेजवळ, सातारा) यांना धडक दिली. त्यात ते जखमी झाले. दि. 21 रोजी ही घटना घडली. शाहूपुरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा करण्यात आला आहे.