सातारा : विकासनगर येथे अज्ञात चोरट्यांनी सुमारे 40 हजारांची घरफोडी केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विकासनगर येथे चोरट्याने घरफोडी करुन दागिने लंपास केले. याप्रकरणी बाळकृष्ण चंदूलाल परदेशी (वय 70, रा. संगमनगर, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चोरट्यांनी घरातून 7 हजराची सोन्याची अंगठी, 18 हजाराचे कानातील झुमके, 1500 तीन चांदीची नाणी, रोख 12 हजार रुपये असा 38 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी झाला आहे. ही घटना दि. 2 फेब्रुवारी रोजी घडली आहे.