सातारा : शेंद्रे येथे अज्ञात चोरट्यांनी सुमारे दोन लाखांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि 5 ते 6 मे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी योगेश बाळकृष्ण शिंदे रा. शेंद्रे, ता. सातारा यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील दरवाजाची कडी कशानेतरी उचकटून घरातील गोदरेजच्या कपाटामधील लॉकर व ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या सुमारे दोन लाख रुपये किंमतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गुरव करीत आहेत.