नागठाणे येथील राष्ट्रीय महामार्गावरील पुलाखाली संशयास्पदरीत्या वावरत असलेला युवक ताब्यात

by Team Satara Today | published on : 27 July 2026


सातारा : नागठाणे येथील राष्ट्रीय महामार्गावरील पुलाखाली चेहरा रुमालाने झाकून संशयास्पदरीत्या वावरत असलेल्या एका युवकाला बोरगाव पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल केतन जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास नफिज अलीम खान (वय 29, रा. नागठाणे) हा पुलाखाली संशयास्पद अवस्थेत आढळून आला. अंधाराचा फायदा घेत चेहरा रुमालाने झाकून स्वतःची ओळख लपविण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याच्यावर संबंधित कायद्यानुसार कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक शेख करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
किरकोळ कारणावरून शेजार्‍यांमध्ये झालेल्या वादाला हिंसक वळण; दोन महिलांना मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हा
पुढील बातमी
महाबळेश्वर-तापोळा रस्ता हद्दीत फळणे वस्तीनजीक खचला; खडी मुरूम टाकून तात्पुरती मलमपट्टी

संबंधित बातम्या