महाराष्ट्र प्रदेश हिंदू महासभेच्या अध्यक्षपदी दत्ताजी सणस यांची बिनविरोध निवड; प्रमुख कार्यवाहपदी महेश सावंत-पटेल

by Team Satara Today | published on : 25 November 2026


सातारा : अखिल भारत हिंदू महासभेची द्विवार्षिक सभा नुकतीच मुंबई येथे उत्साहपूर्ण आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या सभेमध्ये पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीला नवी दिशा देण्यासाठी अध्यक्षपदी साताऱ्यातील दत्ताजी सणस व प्रमुख कार्यवाहपदी महेश सावंत-पटेल या महत्त्वपूर्ण पदांवर बिनविरोध निवड करण्यात आली.
सभेची सुरुवात अरुण माळी यांनी सादर केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणादायी गीतांनी झाली. या द्विवार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानी आनंद कुलकर्णी होते. सभेला महाराष्ट्र प्रदेश हिंदुमहासभेचे प्रमुख नेते उपस्थित होते. त्यात दिनेश भोगले, अनुप केणी, रमेश सुशिर, तिल्लोत्तमाताई खानविलकर, प्रमोद घोरपडे, दत्ताजी राणे, देविदास बंडगर, पांडुरंग पवार, प्रविण गर्जे, संजय कुलकर्णी, राजेंद्र तोरस्कर, विनीत सिंह ई. मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रेरणादायी वातावरणात सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष दत्ताजी सणस यांनी पक्षाचे कार्य अधिक जोमाने आणि नव्या उत्साहाने पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन हिंदूमहासभेची संघटना अधिक मजबूत करणे, पक्षाचा विस्तार करणे आणि हिंदूमहासभेची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, हे आपले प्रमुख उद्दिष्ट असेल, असे त्यांनी सांगितले.
अशा प्रकारे महाराष्ट्र प्रदेश हिंदू महासभेची द्विवार्षिक सभा पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या अभूतपूर्व उत्साहात हिंदु महासभेची बैठक दिमाखात पार पडली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला नवी ऊर्जा, नवी दिशा आणि संघटनात्मक बळ मिळेल असा विश्वास यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.    
 सभेची सांगता अरुण माळी यांनी सादर केलेल्या 'वंदे मातरम्' या राष्ट्रगीताने झाली. संपूर्ण सभागृह देशभक्तीच्या भावनेने भारावून गेले. कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रमुख नेते, कार्यकारिणी सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भीमाबाई आंबेडकर पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी; कुलगुरु डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्या हस्ते होणार म. फुले विचारमंथन व्याख्यानमालेचे उद्घाटन
पुढील बातमी
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विकासाच्या विचारांवर शासनाची वाटचाल - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार; समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून वाहिली आदरांजली

संबंधित बातम्या