सातारा : राहत्या घरातून एक विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 राजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील एका उपनगरात राहणारी विवाहिता घरातून कोणास काही न सांगता निघून गेली आहे. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पाटील करत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा