मुंबई : आमदार रोहित पवार यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना ताप आल्याने चक्कर आली होती. त्यांना उपचारांसाठी तात्काळ मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
आमदार रोहित पवार यांना अचानक चक्कर ताप आणि अशक्तपणा जाणवल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ब्रिच कँडी रुग्णालयात पवार यांची डॉक्टरांकडून सध्या तपासणी सुरु असून, रक्त तपासणी आणी इतर महत्वाच्या चाचण्या केल्या असल्याची माहिती आहे. तसचे सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहितीही समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार ते सतत दौरे करत आहेत. याचदरम्यान त्यांना ताप आल्याने व प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांनी स्वताचा ब्रिच कँडीमध्ये जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेणार आहेत. तसेच विविध तपासण्या करणार आहेत अशी माहिती आहे. याआधी दोन दिवस त्यांची तब्येत बिघडलेली होती त्यामुळे त्यांनी आज रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला.
ते स्वताहून तपासण्या करण्यासाठी रुग्णालयात गेले असून, काळजीच कोणतेही कारण समोर आलेले नाही. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. सध्या रोहित पवार यांनी अनेक मुद्यांवरुन सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे.