09:04pm | Sep 29, 2024 |
सातारा : शेअर मार्केटमधून चांगला परतावा मिळवून देतो, असे सांगत प्रमोद पाटील (रा. कराड) याने 122 जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली असून तात्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा. अन्यथा, सामुहिक पध्दतीने आत्मदहन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, गुंतवणूकदारांनी सातार्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.
अल्लाउद्दीन तांबोळी, हीना मोटा यांच्यासह बर्याच गुंतवणूकदारांनी फसवणूकीबाबतची माहिती दिली.
या फसवणुकीसंदर्भात अल्लाउद्दीन तांबोळी म्हणाले, प्रमोद पाटील याच्यासोबत ओळख झाल्यानंतर त्यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला. आमच्याकडून वेगवेगळ्या दिवशी, ऑनलाइन पद्धतीने व्यवसाय कामासाठी म्हणून आणि मदत म्हणून कराड येथील प्रमोद रमेश पाटील यांनी पैसे घेतले होते. त्या बदल्यात त्यांनी नोटरी आणि त्यांच्या नावाचे चेक सुद्धा दिले होते. त्यानुसार सुरुवातीला काही रक्कम चांगल्या परताव्याने मिळाल्याने तांबोळी यांनी आणखी 10 लाख रुपये पाटील याच्याकडे गुंतवले. सुरुवातीचे दोन ते तीन महिने चांगला परतावा मिळाल्यानंतर चौथ्या महिन्यात मात्र खंड पडला. यावरुन तांबोळी यांनी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली असता पाटील याने आणखी काही कालावधीची मागणी केली. नोटरीची मुदत संपल्यानंतर पाटील यांना पैसे मागितले असता त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. मी महाराष्ट्रातील मोठ्या राजकारण्यांना ओळखतो. तुम्ही माझे काहीच वाकडे करू शकत नाही. तुम्हाला काय करायचे ते करा. तुमचे पैसे देणार नसल्याच्या धमक्या वेळोवेळी पाटील देत होता. याबाबत आम्ही यापूर्वी कराड शहर पोलीस ठाणे, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी पत्रव्यवहार केले आहेत. मात्र कराड पोलिसांकडून आम्हाला म्हणावे तसे सहकार्य झाले नाही. ते कायम पाटील याचीच बाजू घेत होते. त्यामुळे यामध्ये काही आर्थिक देवाण-घेवाण तर झाली नाही ना, अशी शंका यावेळी त्यांनी उपस्थित केली.
वेळोवेळी पाठपुरावा करुनही गुंतवलेली रक्कम व परतावा काहीच मिळत नसल्याने तक्रारदार तांबोळी यांनी अधिक माहिती घेतली असता पाटील याने अनेक लोकांची फसवणूक केल्याचे समोर आले. त्यानुसार सुमारे 122 तक्रारदार असल्याचे समोर आले. हे गुंतवणूकदार एकत्र आल्यानंतर त्यांनी सातारा पोलीस मुख्यालय व कराड शहर पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार अर्ज करुन न्यायाची अपेक्षा केली. मात्र पोलिसांनी अद्यापपर्यंत प्रमोद पाटीलवर गुन्हा दाखल केलेला नाही.
दुसरीकडे संशयित पाटील हा अनेक लोकांना सुसाट फसवत चालला आहे. पाटील हा ऐषोआरामात पुणे येथे वास्तव्य करत आहे. दरम्यान, प्रमोद आता पासपोर्ट काढण्याच्या तयारीत असून लोकांच्या पैशावर त्यांच्या पत्नीचा वाढदिवस हेलिकॉप्टरमध्ये साजरा करत असल्याचा फोटोही त्याने स्टेटसला ठेवला होता. याबाबतचीही माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जात नाही. फसवणूक झालेल्यांमध्ये 1 लाख रुपयांपासून 25 ते 30 लाख रुपये गुंतवलेल्या लोकांचा सहभाग आहे. पैसे दिलेल्याचे पुरावे असताना पोलीस सहकार्य करत नसल्याने लवकरच सामुहिक आत्मदहन आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
या पत्रकार परिषदेला आर्थिक फसवणूक झालेले बरेच लोक उपस्थित होते.
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चोरी |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
पुसेगाव येथे सुमारे सव्वा सात लाखांची घरफोडी |
गोडोली येथील भैरवनाथ मंदिर कलशारोहण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळात सोमवारी व्याख्यान |