कोरेगाव पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता काबीज करत वर्चस्व सिद्ध केले ; जिल्हा परिषदेतही प्रभावी कामगिरी

by Team Satara Today | published on : 10 February 2026


कोरेगाव :  जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत कोरेगाव पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता काबीज करत वर्चस्व सिद्ध केले असून जिल्हा परिषदेतही पक्षाचे तीन सदस्य निवडून आले आहेत. शिवसेनेचे दोन तर भाजपचा एक सदस्य जिल्हा परिषदेत विजयी झाला आहे. 

जिल्हा परिषद – गटनिहाय निकाल.

पिंपोडे बुद्रुक गटातून भाजपचे अमित चव्हाण यांनी १०,७९५ मते मिळवत शिवसेनेचे सतीश धुमाळ यांचा पराभव केला. धुमाळ यांना १०,६५६ मते मिळाली.

वाठार स्टेशन गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री चंद्रकांत भोसले यांनी १२,५४३ मते घेत शिवसेनेच्या सुनीता मोहिते यांचा पराभव केला. मोहिते यांना ९,०७८ मते मिळाली.

सातारारोड गटातून शिवसेनेच्या सारिका रत्नदीप फाळके यांनी १२,६०२ मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया किशोर फाळके यांचा पराभव केला. सुप्रिया फाळके यांना ९,६८७ मते मिळाली.

कुमठे गटात शिवसेनेचे हणमंतराव जगदाळे यांनी १२,३९७ मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर हणमंत उर्फ राजाभाऊ जगदाळे यांचा पराभव केला. राजाभाऊ जगदाळे यांना १२,१५१ मते मिळाली असून फेरमतमोजणीनंतर अंतिम निकाल निश्चित झाला.

एकंबे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश्वरी दयानंद भोसले यांनी १७,४२३ मते मिळवत शिवसेनेच्या सुनिता जवाहरलाल भोसले यांचा दणदणीत पराभव केला. सुनिता भोसले यांना ८,४४४ मते मिळाली.

वाठार किरोली गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संध्यारजनी कांतीलाल भोसले पाटील यांनी ११,८१३ मते मिळवत भाजपच्या श्वेता अभयकुमार गायकवाड यांचा पराभव केला. गायकवाड यांना ८,६४८ मते मिळाली.

पंचायत समिती – गणनिहाय निकाल.

सोनके गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आकाश बाळासाहेब सोळसकर पाटील यांनी ६,१६६ मते मिळवत भाजपचे धनंजय हरिश्चंद्र धुमाळ यांचा पराभव केला. धुमाळ यांना ४,६३३ मते मिळाली.

पिंपोडे बुद्रुक गणातून शिवसेनेच्या रूपाली सुधीर साळुंखे यांनी ५,६१४ मते मिळवत भाजपच्या शर्वरी अमोल निकम यांचा पराभव केला. निकम यांना ५,०१३ मते मिळाली.

वाठार स्टेशन गणातून भाजपच्या अनिता अरुण भोईटे यांनी ५,३७७ मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योत्सना प्रवीण जाधव यांचा पराभव केला. जाधव यांना ४,८५६ मते मिळाली.

अंबवडे संमत वाघोली गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश जगदाळे यांनी ६,७५१ मते मिळवत शिवसेनेच्या दीपक तुकाराम काशीद यांचा पराभव केला. काशीद यांना ४,२३८ मते मिळाली.

सातारारोड गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय आवडे यांनी ४,९४६ मते मिळवत शिवसेनेच्या शहाजी कांबळे यांचा पराभव केला. कांबळे यांना ४,८७६ मते मिळाली.

किन्हई गणातून शिवसेनेच्या सुरेखा रमेश पाटील यांनी ६,९४९ मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शितल राहुल साबळे यांचा पराभव केला. साबळे यांना ४,५२५ मते मिळाली.

कुमठे गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती संदीप जाधव यांनी ६,४७१ मते मिळवत शिवसेनेच्या इंदुमती अमृत जाधव यांचा पराभव केला. इंदुमती जाधव यांना ६,२२२ मते मिळाली.

ल्हासुर्णे गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली शिवाजी गुरव यांनी ६,३३४ मते मिळवत शिवसेनेच्या आरती निलेश जाधव यांचा पराभव केला. जाधव यांना ६,०३६ मते मिळाली.

एकंबे गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे केतन चव्हाण यांनी ८,०७५ मते मिळवत शिवसेनेच्या नितीन भोसले यांचा पराभव केला. भोसले यांना ४,८७६ मते मिळाली.

साप गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजिंक्य कदम यांनी ५,७०२ मते मिळवत शिवसेनेच्या भगवान कदम यांचा पराभव केला. भगवान कदम यांना ४,०३८ मते मिळाली.

आर्वी गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र पवार यांनी ५,५३६ मते मिळवत भाजपच्या अनंत साबळे यांचा पराभव केला. साबळे यांना ४,२५७ मते मिळाली.

वाठार किरोली गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या निकिता चंद्रकांत गिरी यांनी ६,३१० मते मिळवत भाजपच्या संध्या सुनील मलवडकर यांचा पराभव केला. मलवडकर यांना ४,४८१ मते मिळाली.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील यांनी विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याबरोबर फलटण विधानसभा मतदारसंघात युती केली तर कोरेगाव आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे व जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी केलेल्या युतीमुळे कोरेगाव तालुक्यातील राजकीय चित्र बदलले आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्याने मत विभागणी ठळलेली आहे आणि त्याचा परिणाम हा विजयात दिसून आला. पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ९, शिवसेनेचे २ व भाजपचा १ सदस्य विजयी झाला असून जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ३, शिवसेनेचे २ व भाजपचा १ सदस्य निवडून आला आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जावळीत भाजपला धक्का.... शिवसेनेने एक गट, दोन गण केले काबीज; दोन गट व तीन गण राखण्यात भाजपला यश, पंचायत समितीत समसमान बलाबल
पुढील बातमी
जिल्ह्यात कॉपीमुक्त परिक्षा अभियान; जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

संबंधित बातम्या