सातारा : करंडी ग्रामपंचायतीमध्ये खोटे दस्तऐवज तयार करून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह सहाजणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२०१३ ते २०१९ या कालावधीत बनावट लेटरहेड, शिक्के, ग्रामसभा ठराव व ना हरकत दाखले तयार करून आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडून सुरू आहे.