कु.रविना यादव यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत तर, हुतात्मा परशुराम विद्यालयामध्ये विद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. अकरावी आणि बारावी दहिवडी महाविद्यालय आणि इंग्रजी विषय ठेवून वडूज येथील दादासाहेब जोतिराम गोडसे महाविद्यालयात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तसेच डिजिटल महा मीडिया असोसिएशन महाराष्ट्र अंतर्गत पत्रकारिता ही पदवी प्राप्त केली आहे.
छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर येथे डिस्टिंक्शन मधून अमेरिकन लिट्रेचर स्पेशल विषय घेऊन इंग्लिश विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. रविना यांना लहानपणापासून वाचनाची, लिखाणाची प्रचंड आवड होती. आपली आवड जोपासत त्यांनी अनेक बक्षीसे व पुरस्कार पटकावले आहेत. रविना या विद्येचे माहेरघर म्हटले जाणार्या पुणे येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होत्या.आणि 22 मार्च ला झालेल्या महाराष्ट्र मेट्रो रेल स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांचा मार्फत घेतल्या जाणार्या परीक्षेमधे पहिल्याच प्रयत्नात मेन्स आणि इंटरव्यू मधे 179 मार्क्स मिळवून फर्स्ट रैंक मधे येऊन पुणे मेट्रो सुपरवायजर ऑफिसर पदी त्यांची निवड झाली.
रविना यादव यांनी मिळवलेल्या यशाबद्धल त्यांचे सर्व स्तरांतून तसेच ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. पत्रकारिता क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त केलेल्या कुमारी रवीना यादव यांनी अल्पावधीमध्ये अनेक प्रश्न मांडून लेखणीच्या माध्यमातून जनसेवा केली आहे. आता मेट्रोच्या माध्यमातून प्रवाशांची लोकसेवा त्याची संधी त्यांना प्राप्त झाली आहे, अशा शब्दात त्यांचा गौरव केला जात आहे.