स्वतःच्या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 20 November 2025


सातारा  : अमर लक्ष्मी ते सातारा जाणाऱ्या रस्त्यावरून पोवई नाक्याकडे जात असताना साई बाबा मंदिर येथे दुचाकी घसरून राजेंद्र विष्णू कुंभार (वय ५३,  रा. किवळ,ता. कराड) हे भरधाव दुचाकीवरून जात असताना गाडी स्लिप झाल्याने त्यांच्या डोक्यास मार लागून जखमी झाले,उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून हयगयीने,अविचाराने, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात दुचाकी चालवल्याप्रकरणी त्यांच्यावर पोलीस कॉन्स्टेबल सागर गायकवाड यांनी तक्रार दिली असून कुंभार यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पोलीस उपनिरीक्षक जैस्वाल अधिक तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गोडोलीत जुगार अड्ड्यावर छापा टाकून १३००रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य जप्त
पुढील बातमी
वाढे फाटा जाणाऱ्या रस्त्यावर पिकअप चालकाची दुचाकीला धडक; दोन जण गंभीर जखमी.

संबंधित बातम्या