कराड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कराड येथील आदर्श कॉलनी, सुर्यवंशी मळा येथे राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेच्या शाखेचे उद्घाटन पत्रकार मुस्कान तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला म्हणाले, या भागातील तरुण, तरुणी या शिक्षण घेऊन सुद्धा बेरोजगार आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हि संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महारुद्र तिकुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असून या संघटनेचा विस्तार गाव तिथे शाखा हा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. तरी या भागातील नागरिकांच्या काही समस्या असतील तर या शाखेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
यावेळी संघटनेचे कराड तालुका कार्याध्यक्ष सागर लादे, तालुका अध्यक्ष सचिन भिसे, तालुका मार्गदर्शक राकेश पवार, कराड शहर अध्यक्ष विकी शहा, उपाध्यक्ष पंकज मगर, कार्याध्यक्ष साजिद मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आदर्श कॉलनी शाखेच्या अध्यक्षपदी सिध्दार्थ सागरे, उपाध्यक्षपदी वसंत माने, तर सचिवपदी ओंकार भंडारे, उपसचिवपदी विनायक सावंत, ,कोषाध्यक्षपदी प्रतिक सागरे यांच्या निवडी करण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत सागर लादे यांनी केले, तर आभार विकी शहा यांनी मानले.