सातारा : राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात राहणारी 19 वर्षीय युवती राहत्या घरातून नोकरी शोधण्यासाठी जाते, असे सांगून निघून गेली आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.