संशयास्पद वस्तू बाळगल्या प्रकरणी युवकावर गुन्हा

सातारा : संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्या प्रकरणी एका युवकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चारभिंती ते अजिंक्‍यतारा रस्‍त्‍यावर सातारा शहर पोलीस गस्‍त घालत असताना एका युवकाकडे दुचाकी व मोबाईल सापडले. दुचाकी व मोबाईलच्या मालकीबाबत त्‍याला विचारणा केली असता त्‍याने समर्पक उत्तरे दिली नाहीत. यावरुन पोलिसांनी अजित हणमंत पवार (वय २३, रा. मंगळवार पेठ, सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्‍हा दाखल केला आहे.



मागील बातमी
खेड येथे 37 हजारांची घरफोडी
पुढील बातमी
न्यू इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न

संबंधित बातम्या