रक्षक प्रतिष्ठानच्या 'डिजिटल व्हॅन'चे खा.उदयनराजे यांच्या हस्ते लोकार्पण ; नागरिकांच्या दारात जाऊन होणार मोफत आरोग्य तपासणी

by Team Satara Today | published on : 16 March 2026


सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट चौदावे वंशज खा.उदयनराजे यांचे चिरंजीव छ. विरप्रतापसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत डिजिटल आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अत्याधुनिक “तुमच्या दारी मोफत डिजिटल आरोग्य तपासणी डिजिटल व्हॅन” सुरू करण्यात आली आहे. 

रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील मोझर यांच्या मार्गदर्शनाखाली ही अत्याधुनिक वैद्यकीय सेवा देणारी व्हॅन तयार करण्यात आली आहे.या व्हॅनच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत डिजिटल ब्लड तपासणी तसेच प्राथमिक आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या डिजिटल आरोग्य तपासणी व्हॅनचे लोकार्पण खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते सोमवारी जलमंदिर येथे करण्यात आले. या उपक्रमामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आरोग्य तपासणीची सेवा नागरिकांना त्यांच्या घराजवळच उपलब्ध होणार असून, समाजातील सर्व घटकांना याचा लाभ मिळणार आहे. रक्षक प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना सुलभ आणि मोफत आरोग्य तपासणीची सुविधा मिळणार असल्याचे खा.उदयनराजे यांनी सांगितले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
थकबाकीदारांवर सातारा पालिकेची कारवाई; गोडोली-विलासपूर परिसरातील ३ गाळे सील
पुढील बातमी
सदरबाजार येथील बंद पडलेल्या इमारतीच्या आडोशाला अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या