सातारा : महिलेवरील अत्याचारासह तिची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मार्च 2019 ते ऑक्टोबर 2023 दरम्यान कोरेगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन करून तिच्याकडून 64 लाख 78 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी महेश शिवाजी माने रा. रणसिंगवाडी, ता. खटाव, जि. सातारा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे करीत आहेत.