उन्हाळ्यात हापूस आंब्यांपासून घरच्या घरी बनवा थंडगार मँगो मस्तानी

by Team Satara Today | published on : 28 April 2025


लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं हापूस आंबा खायला खूप आवडतो. हापूस आंब्याचे नाव घेतल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. याशिवाय आंब्यामध्ये असलेले घटक आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. फळांचा राजा म्हणून सगळीकडे हापूस आंब्याची ओळख आहे. कोकणातील हापूस आंबा जगभरात सगळीकडेच प्रसिद्ध आहे. हापूस आंब्याचा सीजन चालू झाल्यानंतर सगळीकडे पिकलेल्या आंब्यांपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. मँगो लस्सी, आमरस, मोदक, पुरणपोळी, सांज्याची पोळी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला पुण्यात प्रसिद्ध असलेली मँगो मस्तानी घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये कशी बनवावी, याची रेसिपी सांगणार आहोत. हापूस आंब्यांपासून बनवलेली मँगो मस्तानी खाण्यासाठी लांबून लांबून लोक पुण्यात जातात. मँगो मस्तानी म्हणजे हापूस आंब्यांपासून घट्टसर शेक. चला तर जाणून घेऊया मँगो मस्तानी बनवण्याची सोपी रेसिपी. 

साहित्य:

हापूस आंबा

दूध

काजू बदामाचे तुकडे

वॅनिला आईस्क्रीम

कृती:

मँगो मस्तनी बनवण्यासाठी सर्वप्रथम, पिकलेले हापूस आंबे पाण्यात काहीवेळा ठेवून नंतर त्यांची साल काढून बारीक तुकडे करून घ्या.

त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आंब्याचे तुकडे घेऊन दूध टाकून बारीक पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर त्यात वॅनिला आईस्क्रीम टाकून पुन्हा एकदा जाडसर पेस्ट बनवा.

काचेच्या भांड्यात आंब्याची मस्तानी ओतून त्यानंतर वरून वॅनिला आईस्क्रीम आणि काजू बदामाचे तुकडे टाकून सर्व्ह करा.

तुम्ही बनवलेली आंब्याची मस्तानी लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

मस्तानी सर्व्ह करताना त्यात आंब्याचे बारीक बारीक तुकडे टाका. यामुळे पदार्थाची चव आणखीनच वाढेल आणि मस्तानी सुंदर लागेल.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
संगम माहुली येथे महाराणी ताराबाई यांचे भव्य स्मारक उभारणार
पुढील बातमी
'छावा'च्या यशाचं कारण विकी कौशल नाही

संबंधित बातम्या