९९व्या संमेलनाने काय मिळविले याचा उहापोह करताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, संमेलनातून दूर गेलेल्या रसिकांना या संमेलनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा साहित्याच्या मांडवात आणण्याचे कार्य केले आहे. हे संमेलन वाचककेंद्री, साहित्यकेंद्री आणि पुस्तककेंद्री करण्यात यश मिळाले आहे. सत्ताधाऱ्यांच्या उपस्थितीत मराठी भाषेचा कळवळा साहित्य महामंडळ ठामपणे मांडू शकते हेही या संमेलनाने दाखवून दिले आहे. या संमेलनाची स्पंदने सातारच्या मातीत दीर्घकाळ रेंगाळत राहतील, यातून अनेक नवे साहित्यि निर्माण होतील हा विश्वास आहे. राबणारे हजारो हात सातारकरांच्या माध्यमातून मिळाल्याने हा सोहळा देखणा झाला आहे. संमेलनात घडलेल्या अप्रिय घटनांना साहित्यिक, साहित्यप्रेमी रसिकांनी झुरळासारखे झटकले आणि हे संमेलन प्रचंड उपस्थितीने यशस्वी झाले, हे खरे साहित्यप्रेम आहे. संमेलनाचा निधी ५० लाख रुपयांवरून २ कोटी करण्याचे श्रेय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाते. उदय सामंत हे उद्योग व भाषा मंत्री असल्याने भाषेच्या पाठीशी त्यांनी उद्योग उभे केले तर मराठी भाषेला काहीही कमी पडणार नाही. १८७८ साली पुण्यात पहिले ग्रंथकार संमेलन झाले हे वर्तुळ पूर्ण करताना शंभरावे संमेलन पुण्यात होणार असून महाराष्ट्र साहित्य परिषद त्याचे आयोजन करणार आहे.
शंभरावे मराठी साहित्य संमेलन पुण्यात घेणार : प्रा. मिलिंद जोशी; महाराष्ट्र साहित्य परिषद त्याचे आयोजन करणार
by Team Satara Today | published on : 04 January 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा