कर्नाटकचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या ठिकाणांवर EDचा छापा; महाराष्ट्रासह १८ ठिकाणी एकाचवेळी कारवाई

by Team Satara Today | published on : 09 September 2026


बंगळुरू : कर्नाटकचे PWD मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या ठिकाणांवर EDचा छापेमारी झाली आहे. बंगळुरू, बेळगावसह महाराष्ट्रातील जवळपास १८ ठिकाणी एकाचवेळी छापे पडले आहेत. सतीश जारकीहोळी यांच्या डॉलर्स कॉलनीतील निवासस्थानीही EDची कारवाई झाली असून कर्नाटकात एकच खळबळ उडाली आहे.
काँग्रेस खासदार आणि त्यांची कन्या प्रियंका जारकीहोळी यांच्याशी संबंधित ठिकाणांचाही ED कडून कसून तपास सुरू आहे. २४ जूनला जारकीहोळी यांचे मेहुणे मंजुनाथ यांच्या घरावरही ED ने छापा टाकला होता. परदेशात बेकायदेशीररीत्या पैसा पाठवल्याच्या प्रकरणाशी तपासाचा संबंध असल्याच समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कर्नाटकचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या ठिकाणांवर EDचा छापा; महाराष्ट्रासह १८ ठिकाणी एकाचवेळी कारवाई
पुढील बातमी
'माझ्या भाषेचे निमित्त करून पळ काढू नका'; छ. संभाजीनगरच्या बैठकीत षड्यंत्र रचले, मनोज जरांगेंचा आरोप

संबंधित बातम्या