सातारा तालुक्यातील सरपंच पदाचे 4 जुलै रोजी फेर आरक्षण

by Team Satara Today | published on : 27 June 2025


सातारा : सातारा तालुक्यातील एकूण 197 ग्रामपंचायतसाठी जाहीर सोडतीद्वारे सन 2025 ते सन 2030 या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीकरीता ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करुन त्या बाबतचा आदेश पारीत करण्यात आला होता. तथापि राज्यशासनाच्या अधिसुचनेनुसार सन 2025 ते 2030 य कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या जिल्हानिहाय वाटप करण्यात आलेल्या सरपंच पदाचे फेर आरक्षण निश्चित करण्यात आलेले आहे.

सातारा जिल्हयात सन 2025 ते 2030 या कालावधीत निवडणुक होणाऱ्या ग्रामपंचायतीची संख्या एकुण 197 आहे. यासाठी पुढीलप्रमाणे सरपंच पदाचे फेर आरक्षण निश्चीत करण्यात आले आहे. अनुसुचित जातीसाठी महिला 11, खुला 11 आरक्षीत सरपंच पदे, अनुसुचित जमातीसाठी महिला 1 आरक्षीत सरपंच पद, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी महिला 27 खुला 26 आरक्षित सरपंच पदे, सर्वसाधारण प्रवर्गासाठी महिला 61 खुला 60 अशी आरक्षित पदे निश्चित करण्यात आली आहेत.

यानुसार ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम शुक्रवार दि. 4 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सातारा पंचायत समिती येथे छत्रपती अभयसिंहराजे भोसले सभागृहात ठेवण्यात आला आहे. आरक्षण सोडत बैठक कामी आमदार 262 सातारा विधानसभा मतदार संघ, आमदार 257 कोरगाव विधानसभा मतदार संघ, आमदार 259 विधानसभा मतदार संघ, प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा, प्रशासक तथा गटविकास अधिकारी, पंचायत समिती सातारा, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रभारी तहसिलदार सुजाता पाटील यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा रुग्णालयात 0 ते १८ वयोगटातील 115 बालकांची मोफत टू डी इको तपासणी
पुढील बातमी
जिल्हा परिषदेत सामाजिक न्याय दिन आणि राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा

संबंधित बातम्या