धामणी मध्यम प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत ना. मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस मदत व पुनर्वसन विभागाचे सह सचिव संजय इंगळे, जलसंपदा विभागाचे उपसचिव प्रवीण कोल्हे, कोल्हापूर जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, कोल्हापूरच्या जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा सिंघन उपस्थित होत्या. ना. मकरंद पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात हा प्रकल्प होत असून या प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण होण्यासाठी 25 प्रकल्पग्रस्तांच्या संदर्भातील प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावा.
धामणी प्रकल्पग्रस्तांना आर्थिक पॅकेज द्या : ना. मकरंद पाटील
by Team Satara Today | published on : 12 February 2025
सातारा : धामणी मध्यम प्रकल्पातील 25 प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीनीऐवजी आर्थिक पॅकेज देण्यासंदर्भात जलसंपदा विभाग व मदत पुनर्वसन विभागाने सामंजस्याने तातडीने निर्णय घ्यावा, अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिल्या.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी ‘आमने बंगला’ प्रकरणाला गती
April 25, 2026
अजिंक्यतारा किल्ल्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार
April 23, 2026
३४ वा फुले-आंबेडकर पुरस्कार पत्रकार राजू परुळेकर यांना जाहीर
April 22, 2026