जयस्वालच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

आयपीएलमध्ये रचला आणखी एक विक्रम

by Team Satara Today | published on : 21 May 2025


दिल्ली  : यशस्वी जयस्वालने इंडियन प्रीमियर लीगमध्ये एक विक्रम नोंदवला आहे. त्याने वीरेंद्र सेहवागचा एक खास विक्रम मोडला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या 61व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वालने डावाची सुरुवात केली.

चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात सलामीला आलेल्या यशस्वी जयस्वालने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. या चौकारासह यशस्वी जयस्वालने आयपीएल इतिहासात पहिल्याच चेंडूवर सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम केला आहे.

यशस्वी जयस्वालच्या आधी हा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावावर होता. वीरेंद्र सेहवागने 2014 आयपीएल स्पर्धेत डावाच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारण्याची किमया पाच वेळा केली होती. मात्र यशस्वी जयस्वालने हा विक्रम मोडीत काढला आहे. 

यशस्वी जयस्वालने आयपीएल 2023 मध्ये डावाच्या पहिल्या चेंडूवर पाचवेळा चौकार मारून वीरेंद्र सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी केली. 2025 मध्ये ही कामगिरी पुन्हा केली आहे. यावर्षी डावाची सुरुवात करणाऱ्या यशस्वी जयस्वालने पहिल्याच चेंडूवर पाचवेळा चौकार मारला आहे.

दोन पर्वात डावाच्या पहिल्या चेंडूवर 10 वेळा चौकार मारून आयपीएलच्या इतिहासात एक विशेष विक्रम प्रस्थापित केला आहे. या विक्रमासह, यशस्वी जयस्वालने यावेळी 559 धावा करून आपल्या आयपीएल मोहिमेचा शेवट केला. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
देशामध्ये राजधानी दिल्लीसह इतर 11 राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण
पुढील बातमी
कोट्यवधी पाण्यात; सातार्‍यातील नव्या कोर्‍या सर्किट हाऊसला गळती

संबंधित बातम्या