सीसीटीव्ही बसवण्यावरून कृष्णानगर येथे व्यावसायिकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 25 March 2026


सातारा  : कृष्णानगर येथे रामदेव स्टिल अँड टिंबर्स दुकानात सीसीटीव्ही बसविण्यासाठी नासीर भाई हे आले असताना राहुल चंदुलाल मुथा (वय ३८) यांच्या शेजारी राहणारे ममता जैन आणि दीपक जैन हे सीसीटीव्ही बसवण्याच्या ठिकाणी आले. यावेळी त्यांनी तुम्ही येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे नाहीत असे सांगून राहुल मुथा यांना शिवीगाळ करत त्यांच्या विरोधात खोटा विनयभंग दाखल करण्याची धमकी दिली. 

यावेळी त्यांनी दुकानातून १७ हजार रुपये किमतीचे सीसीटीव्हीचे डीव्हीआर आणि कॅमेरे तसेच ड्रिल मशीन, हातोडा स्क्रू-ड्रायव्हर इत्यादी साहित्य चोरून नेले आहे. याप्रकरणी राहुल मुथा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांनी विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार यादव करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बांधकामाच्या कारणावरून वादातून पिंपळवाडी दोन कुटुंबात वाद; परस्पर विरोधी तक्रारी दाखल
पुढील बातमी
शाहूनगर येथून २० हजार रुपये किमतीच्या दुचाकीची चोरी

संबंधित बातम्या