सासपडे येथे केबल वायरच्या वादातून बोरगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल

by Team Satara Today | published on : 29 July 2026


सातारा : सासपडे (ता. सातारा) येथे केबल वायरच्या कारणावरून सुरू झालेल्या वादातून एकमेकांविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका तक्रारीत घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे, तर दुसर्‍या तक्रारीत महिलेकडे लपून पाहणे, मारहाण व धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नारायण ज्ञानू देटके (वय 56, रा. सासपडे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 28 जुलै रोजी दुपारी घराशेजारील मोकळ्या जागेतील केबल वायरचे छायाचित्र काढत असताना नागेश मोहन देटके, अनिता नागेश देटके, पूजा समाधान देटके, बेबीताई मोहन देटके व भागाबाई गोजाबा कमाने यांनी जाब विचारत वाद घातला. त्यानंतर घरात घुसून दांडक्याने मारहाण तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस फौजदार चव्हाण तपास करीत आहेत.

दरम्यान, याच प्रकरणात 30 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, 22 जुलै रोजी घराबाहेरील स्नानगृहात अंघोळ करत असताना नारायण देटके यांनी भिंतीआडून लपून पाहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच 28 जुलै रोजी केबल वायर कचरा गाडीत टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादात दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याबरोबरच शिवीगाळ व धमकावल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी नारायण ज्ञानू देटके यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला पोलीस हवालदार जाधव अधिक तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महामार्गावरील काशीळ येथे भरधाव ट्रक दुभाजकावर धडकला; ट्रकचे मोठे नुकसान, चालकावर गुन्हा
पुढील बातमी
साताऱ्यात कॉलेज परिसरात वाहतूक नियमभंगाविरोधात कारवाई; सपोनि राजेश माने यांच्या नेतृत्वाखाली अचानक नाकाबंदी; 32 हजार 500 रुपयांचा दंड वसूल

संबंधित बातम्या