साताऱ्यात कर्मवीरांच्या स्मृतींना होणार अभिवादन; रयत शिक्षण संस्थेचा ९ मे रोजी भव्य कार्यक्रम

by Team Satara Today | published on : 06 May 2026


सातारा : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि शिक्षण क्षेत्रातील महान कार्यकर्ते पद्मभूषण डॉ. कमवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त ९ मे २०२६ रोजी साताऱ्यात विविध उपक्रमांनी युक्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८.३० वाजता कमवीर समाधी स्थळी हा कार्यक्रम पार पडणार असून, शिक्षणप्रेमी आणि संस्थेशी निगडित घटक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध मान्यवरांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या उद्योजक, दाते व संस्थांना सन्मानित केले जाणार आहे.तसेच या निमित्ताने रयत शिक्षण संस्थेच्या प्रकाशन विभागातील विविध अंकांचे तसेच ‘कमवीर सांगाती’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. संस्थेच्या शैक्षणिक कामगिरीत उल्लेखनीय प्रगती करणाऱ्या शाखांना ‘कमवीर पारितोषिक’ देऊन गौरविण्यात येणार असून, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना ‘यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे.

कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, विविध शाखांचे प्रतिनिधी, शिक्षकवर्ग आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात 8 ते 9 मेपर्यंत पावसाचा इशारा; वातावरणात बदल
पुढील बातमी
महिला-बालकांवरील अत्याचारांना आळा घाला; दोषींना तात्काळ मृत्युदंड द्या - श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

संबंधित बातम्या