सातारा : तालीम संघाजवळ असलेल्या मिया बाय तनिष्क या ज्वेलरी दुकानात अज्ञात महिलेने सोने चोरुन ‘हात की सफाई’ केली. इअर रिंग दाखवण्याच्या बहाण्याने 5 ग्रॅम वजनाचा सुमारे 1 लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरला.
मोहसीन मौला रांगोळे (वय 36, रा.सातारा) यांनी अज्ञात महिलेविरुध्द तक्रार दिली आहे. ते ज्वेलरी दुकानचे मॅनेजर आहेत. ही घटना दि. 16 ऑगस्ट रोजी घडली आहे. अनोळखी महिला ज्वेलरी दुकानात आली. सोने बघायच्या निमित्ताने ही चोरी केली. सीसीटीव्हीत ही घटना समोर आल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.