कोडोली येथील एकाची 58 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

by Team Satara Today | published on : 20 August 2026


सातारा : एकाची 58 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दिनांक 18 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ऋषिकेश महादेव शिंदे (रा. कोडोली सातारा) यांना हॉटेल प्रीती एक्झिक्यूटिव्ह परिसरातील ॲक्सिस बँकेच्या समोर एका अज्ञाताने 'मला कॅशची आवश्यकता आहे. मला कॅश द्या, मी तुम्हाला ऑनलाईन पैसे पाठवतो', असे म्हणून शिंदे यांच्याकडून रोख 58 हजार रुपये घेऊन त्यांना ऑनलाईन पैसे न पाठवता त्यांची फसवणूक करून निघून गेला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार अवघडे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सुमारे 6 कोटी 35 लाखांच्या फसवणूक प्रकरणी अमृतसरच्या तीन जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यातगुन्हा
पुढील बातमी
सातारा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे अपहरण; अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल

संबंधित बातम्या