सातारा : बचतगटाच्या कर्जाच्या कारणावरून झालेल्या वादात एका महिलेला मारहाण करून जिन्यावरून ढकलल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, आरोपींनी वादाच्या वेळी काठीने मारहाण केली, मोबाईल हिसकावून घेतला आणि जिन्यावरून ढकलल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.