सातारा : उंचावरुन पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धुमाळआळी ता.सातारा येथे बंगल्याचे पायड बांधत असताना उंचावरुन पडल्याने अशोककुमार रामस्वरुप कुमावत (वय 35, मूळ रा.राजस्थान सध्या रा. धुमाळआळी) या कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना दि. 29 ऑक्टोबर रोजी घडली आहे. घटनेनंतर तात्काळ उपचारासाठी सिव्हीलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. शाहूपुरी पोलीस ठाणे पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
पायड बांधत असताना पडल्याने कामगाराचा मृत्यू; साताऱ्यातील धुमाळआळीतील घटना
by Team Satara Today | published on : 30 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा