भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज 15 मार्चपर्यंत भरण्यास मुदतवाढ

by Team Satara Today | published on : 07 March 2025


सातारा :   सन 2024-25 या वर्षापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन करण्यात आलेली आहे. सदर योजनेचे अर्ज ऑनलाईन पोर्टलद्वारे 15 मार्चपर्यंत भरण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

यापूर्वी स्वाधार योजनेचा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी बँक तपशिल भरण्याबाबतचा टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यानुसार संबंधित विद्यार्थ्यांनी बँक तपशिल तात्काळ भरण्याची कार्यवाही करावी तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरलेला आहे परंतू अर्ज व त्यासोबत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती अद्यापपर्यंत सादर केलेल्या नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी सर्व कागदपत्रे सहायक आयुक्त, समाज कल्याण, सातारा कार्यालयात किंवा तालुक्याचे मुलां/मुलींचे शासकीय वसतिगृहात सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ससूनमधील रिक्त पदे लवकरच भरणार
पुढील बातमी
चित्रकार रवी मुकुलांनी उलगडली मुखपृष्ठाच्या पाठीमागची गोष्ट

संबंधित बातम्या