08:31pm | Nov 27, 2024 |
सातारा : शहरातील विविध ठिकाणच्या मंडईसह मुख्य बस स्थानकानजीकच्या शेतकऱ्यांच्या मंडईतही कांद्याचा भाव वधारला आहे. यामुळे कांदा खरेदीत गृहिणी आखडता हात घेऊ लागल्या आहेत. दुसरीकडे घाऊक बाजारात कांद्याच्या दराची चढती कमान राहिल्याने किरकोळ खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांपासून हॉटेल व्यावसायिकांनी कांद्याचा समावेश असलेल्या पदार्थांचे तूर्तास दर वाढवले आहेत. काही ठिकाणी तर ताटात कांद्याऐवजी ग्राहकांना कोबी देण्यात येत आहे.
सध्या बाजारात मागणीपेक्षा कांद्याची आवक होत नाही. परिणामी कांद्याचे दर वाढू लागले आहेत. शहरातील किरकोळ बाजारात जुन्या कांद्याचा भाव ८० रुपयांपासून १२० रुपयांपर्यंत पोचला आहे. नवीन कांदा बाजारात आला असला तरी जुन्या कांद्याचा भाव तेजीत राहील, असे चित्र आहे. याबाबत विक्रेत्यांकडून देखील दुजोरा दिला जात आहे. या भाववाढीमुळे एरवीही दोन-तीन किलो कांदा नेणारे ग्राहक आता अर्ध्या किलोवर आल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
गोबी मंच्युरियनला मागणी वाढली...
शहरातील विविध ठिकाणी गोबी मंच्युरियन हातगाड्यांवर, बेकरीमध्ये मिळते. गेल्या काही दिवसांपासून सामान्य नागरिकांचा गोबी मंच्युरियन खाण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे. कांदा भजीचे दर वाढल्याने सर्वसामान्यांनी गोबी मंच्युरियनकडे आपला मोर्चा वळविला आहे. गोबी मंच्युरियनबरोबर युवा वर्गात सँडविचला काही प्रमाणात मागणी वाढली आहे. सँडविचमध्ये कांदा सोडून काकडी, कोबीसह टोमॅटोचा समावेश असतो.
भजीपासून ऑम्लेटवर झाला परिणाम...
कांद्याच्या वाढत्या भावामुळे शहरातील विविध हॉटेलमध्ये कांदा भजी, मिसळ, पावभाजी यासह हातगाडीवर किरकोळ खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांनी भेळ, ऑम्लेट या पदार्थांमध्ये कांदा टाकण्याचे प्रमाण कमी केले आहे. काही ठिकाणी या पदार्थ्यांच्या भावात काहीशी वाढ करण्यात आली आहे. ढाब्यांवर तर ग्राहकांना कांदा देणेच बंद झाल्याचेही चित्र आहे. ज्या ग्राहकांना ताटाबरोबर कांदा हवा असल्यास त्यांच्याकडून जादा दर आकारला जात आहे.
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |
कोळेवाडी ग्रामसभेत मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा ठराव |
सर्वांना बरोबर घेऊन मलकापूरचा विकास करणार : आ. डॉ. अतुलबाबा भोसले |