कारची काच फोडून कारमधील सोन्याचे दागिने लंपास

सातारा : कारची काच फोडून अज्ञात चोरट्याने कारमधील पर्स मधून सोन्याचे दागिने लंपास केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा जिल्हा परिषदेतच्या मैदानालगत पार्क केलेल्या कारची काच फोडून कारमधील पर्स मधून चोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना दि. 12 फेब्रुवारी रोजी घडली असून याप्रकरणी विजय मारुती भंडारे (वय 45, रा. डबेवाडी ता.सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चोरट्यांनी पर्समधून 70 हजाराचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, 3 हजार रुपयांचा मोबाईल असा 73 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.


मागील बातमी
तामजाईनगर येथे युवकाची आत्महत्या

संबंधित बातम्या