सातारा : कारी, ता. सातारा येथे ओढ्यास आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या वृध्दाचा मृतदेह शाहूपूर, ता. सातारा गावाच्या हद्दीतील बंधार्यात आढळून आला. जगन्नाथ जिजाबा अडागळे (वय 65, रा. कारी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 रोजी दुपारी 3 च्यानंतर दि. 27 रोजीच्या दरम्यान मळवी नावाच्या शिवारातील ओढ्यास आलेल्या पुराच्या पाण्यात अडागळे हे बेपत्ता झाले होते. याबाबत रमेश मधुकर मोरे (रा. कारी) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. अडागळे यांचा मृतदेह शुक्रवारी रात्री शाहपूर गावच्या हद्दीतील केटी बंधार्यात आढळून आला. सहायक फौजदार वायंदडे अधिक तपास करत आहेत.